
मुंबई : मोबाईल उत्पादक कंपनी सोनीने आपल्या एक्सपीरिया XZs च्या किंमतीत मोठी कपात केली असून या फोनच्या किंमतीत १३ हजार ६०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन आता ३६ हजार ३९९ रुपयात उपलब्ध आहे.
सोनीच्या ‘या’ फोनवर तब्बल १३६०० रुपयांची सवलत
ब्ल्यू, वार्म सिल्व्हर आणि ब्लॅक कलरमध्ये सोनी एक्सपीरिया XZs उपलब्ध असेल. या फोनमध्ये १९ मेगापिक्सेलचा मोशन आय कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात ९६० फ्रेम/सेकंडच्या वेगाने सुपर स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो. 4K व्हिडिओही या फोनमध्ये रेकॉर्ड केला जाऊ शकतो. १९ मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि १३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा या फोनमध्ये देण्यात आला आहे. शिवाय ४जीबी रॅम आणि ६४जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
