
नवी दिल्ली : एनर्जेटिक ब्लू या रंगातील व्ही७ हा स्मार्टफोन चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी व्हिवोने लाँच केला. १८,९९० रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत आहे. याची ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही ठिकाणी विक्री सुरु करण्यात आली आहे.
व्हीवोने आणला दमदार फीचर्ससह नवा स्मार्टफोन
व्हीवो व्ही७ मध्ये २४ मेगापिक्सेल सेल्फी आणि १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर ४ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, फुल एचडी व्ह्यू डिस्प्ले आणि ३०००एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मून लाईट ग्लो आणि फेस अॅक्सेस फीचरही देण्यात आले आहे.
व्हिवोने याआधी हा स्मार्टफोन मॅट ब्लॅक आणि शँपेन गोल्ड या दोन कलरमध्ये लाँच केला होता. खास सेल्फीप्रेमींसाठी गेल्या महिन्यात हा स्मार्टफोन लाँच केला होता. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवरुन फोन घेतल्यास १८ हजार रुपयापर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. त्यासोबतच व्हिवोकडून एका वर्षापर्यंत रिप्लेसमेंट ऑफरही दिली जात आहे.
