ओलाचे लवकरच फूड डिलिव्हरीत पदार्पण !


आता ‘फूड पांडा’ या कंपनीचे अधिग्रहण अ‍ॅपवर आधारित कॅब अ‍ॅग्रीगेटर ओलाने केले असून फूड डिलीव्हरीच्या क्षेत्रात लवकरच पदार्पण करण्याचे संकेत ओलाने दिले आहेत.

अलीकडेच ‘फूड पांडा’ला ‘डिलीव्हरी हिरो’ या जर्मन कंपनीने विकत घेतले होते. पण याची मालकी आता ओलाकडे आली आहे. हा व्यवहार नेमका किती रूपयांचा आहे याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. पण लवकरच ओला ऑनलाईन फूड डिलीव्हरीच्या क्षेत्रात उतरणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

ओला यासाठी तब्बल २० कोटी डॉलर्स (अंदाजे १२८१ कोटी रूपये) ऐवढी गुंतवणूक करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. भारतातील १०० शहरांमधील सुमारे १५ हजार उपहारगृहे ‘फूड पांडा’शी संलग्न आहेत. ओलाच्या पंखाखाली आल्यानंतर याचा जलद गतीने विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment