
देशातील लोकप्रिय मोटरसायकल कंपनी रॉयल एनफिल्डच्या स्टील्थ ब्लॅक क्लासिक ५०० या १५ खास लिमिटेड बाईक्स सेल सुरू होताच अवघ्या १५ सेकंदात विकल्या गेल्याचे जाहीर केले गेले आहे. या बाईक्सची किंमत १ लाख ९० हजार रूपये होती व ऑनलाईन सेलमध्ये २ हजार ग्राहकांनी त्यासाठी मागणी नोंदविली होती.
अवघ्या १५ सेकंदात विकल्या गेल्या एनफिल्डच्या ‘त्या’ खास बाईक्स
या बाईक्स खास होत्या. म्हणजे या बाईक्स देशातील ब्लॅक कॅट एनएसजी कमांडोंच्या खास मोहिमेचा एक भाग होत्या. एनएसजीच्या १५ बहादूर कमांडोनी या बाईक्सवरून देशात ८ हजार किमीचा प्रवास केला होता. या मोहिमेच्या उद्देश दहशतवादविरोधात नागरिकांत जागृती करणे व सैन्य दलाला या साठी नागरिकांकडून सहकार्य हवे असल्याचे सांगणे हा होता. दहशतदवाद संपविण्याची जबाबदारी जवानांबरोबर नागरिकांवरही आहे असा संदेश यातून दिला गेला होता. या बाईक्सवर एनएसजीचे चिन्ह कोरले गेले आहे.
