फेसबुकने सुरु केले क्लिक-टू-व्हाट्सअॅप बटण


सेन्ट फ्रांसिस्को : तुम्ही आता फेसबुकवर अधिक लोकांशी जोडू शकता. कारण क्लिक-टू-व्हाट्सअॅप हे एक नवीन बटण फेसबुकने सुरू केल्यामुळे जाहिरात देणारा एक अरबपेक्षा अधिक व्हाट्सअॅप युजर्सना जोडू शकतो.

जाहिरातीत हे बटण दिले जाईल. व्हाट्सअॅप-फेसबुक यामुळे जोडले जाईल. दोन अरबपेक्षा अधिक युजर्स फेसबुकचे आहेत. तुम्ही या फिचरमुळे एका क्लिक वरून जाहिरातीत जोडू शकता. त्यामुळे जाहिरात पाहणारे युजर्स व्हाट्सअॅप कॉल किंवा मेसेजने जाहिरातीशी जोडू शकतात. हे फिचर हळूहळू लागू करण्यात येईल. हे फिचर सुरुवातीला उत्तर-दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि आशियात लॉन्च करण्यात येईल.

याबाबत माहिती देताना फेसबुकचे प्रबंधक पंचम गज्जर यांनी सांगितले की, जास्तकरून लोक लहान व्यवसायांच्या प्रमोशनसाठी व्हाट्सअॅपचा वापर करतात. संपर्कात राहण्याचा सोपा आणि जलद हा पर्याय आहे. फेसबुकच्या जाहिरातींना क्लिक-टू-व्हाट्सअॅप बटण जोडल्याने व्यावसायिकांना नक्कीच फायदा होईल, असे ते म्हणाले.

Leave a Comment