
नवी दिल्ली: कॅमेरा आपल्या आयुष्यातील असे क्षण कॅप्चर करतो. ज्याला बघून आपला मूड रिफ्रेश होतो. पण नॉर्वेमध्ये राहत असलेल्या रॉबर्टसन यांच्यासोबत काही वेगळीच घटना घडली आहे. त्यांनी एका पक्ष्याचा जवळून फोटो घेण्याचा प्रयत्न केला पण पक्षी त्यांचा कॅमेराच घेऊन उडून गेला. त्यानंतर काय घडले आश्चर्यचकित करणारे होते. 5 महिन्यांनंतर कॅमे-यात व्हिडीओ बघण्यात आला तो सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चला तर बघूया नेमके काय झाले ते…
पक्ष्याने चोरला कॅमेरा, त्यात ५ महिन्यांनंतर सापडला हैराण करणार व्हिडीओ
रॉबर्टसनला पक्ष्यांचे जवळून फुटेज हवे होते. म्हणून त्याने घराच्या अंगणात काही ब्रेडचे तुकडे ठेवले आणि त्यासोबत काही कॅमेरे देखील ठेवले होते. काही मिनिटांनंतर पक्षी येऊन ब्रेड खाऊ लागले. त्यातील एक पक्षी इतका भुकेलेला होता की तो कॅमेरा घेऊनच उडून गेला. पक्षी हवेत उडत होता तेव्हा ते क्षण हा कॅमेरा रेकॉर्ड करत होता. ते दृश्य असे होते की एखाद्या ड्रोनने ते टिपले असावे असे वाटत होते. काही मीटर दूर गेल्यानंतर त्या पक्षाने हा कॅमेरा सोडून पळून गेला.
रॉबर्टसनने कॅमेरा शोधण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण त्याला 5 महिने कॅमे-याचा पत्ताच लागला नाही. पण त्याला तो मिळाला तेव्हा त्याला त्यात शानदार आढळले. हे व्हिडिओ Gopro अंतर्गत आढळून आले. जे YouTube वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत, या व्हिडिओला जवळजवळ १ लाख लोकांनी पाहिले आहे.
