भंगार आणि रिसायकल वस्तुंपासून तयार केले तरंगणारे घर

कॅनडाच्या वँक्यूवर आयलँडवर पाण्यावर तरंगणारे घर तयार करण्यात आलेले आहे.  या घराचे मालक कॅथरिंग किंग आणि त्यांचे पती वेन एडम्स हे आहेत. 71 वर्षीय वेन एडम्स यांनी 1991 मध्ये हे घर तयार करण्यास सुरुवात केली होती. 12 प्लोटिंग प्लॅटफॉर्म्सद्वारे बनविण्यात आलेल्या या घरात सोलर एनर्जी सिस्टम आहे. दोघांनी हे घर तयार करण्यासाठी तब्बल 2.40 लाख पार्ट्सचा वापर केला आहे.

यातील अधिकतर पार्ट्स हे भंगार, रिसायकल्ड केलेल्या वस्तूच आहेत. खास गोष्ट म्हणजे जर वादळ किंवा अन्य कारणामुळे घराला काही झाले तर ते त्वरित त्याला दुरूस्त करतात.

एडम्स म्हणतात की, या सुंदर घराला बनविण्यासाठी आम्हाला यावर सतत काम करत रहावे लागते. कॅथरिन किंग या एक डान्सर आहेत तर त्यांचे पती एडम्स प्रोफेशन आर्टिस्ट आहेत.

Leave a Comment