
नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या पदार्पणानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये सुरु असलेले वॉर सातत्याने वाढत आहे. कंपन्या जिओला टक्कर देण्यासाठी वारंवार नवनवीन प्लॅन लॉन्च करत आहेत. त्यात आयडियाने आता आपला नवीन प्लॅन सादर केला आहे.
आयडियाने आणला ३०९ रूपयांचा नवा प्लॅन
३०९ रूपयात आयडिया प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा देत आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड लोकल व एसटीडी कॉलची सुविधा देखील मिळत आहेत. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये फ्रि आऊटगोइंग रोमिंग आणि दिवसाला १०० मेसेज पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे.
हा प्लॅन जे ग्राहक माय आयडिया अॅपच्या अधिकृत वेबसाईटवरून घेतील त्यांना १ जीबी अधिकचा डेटा देण्यात येणार आहे. पण आयडियाने या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळवण्यासाठी एक अट लागू केली आहे. यात दर दिवशी २५० मिनिट आणि आठवड्यातून १००० मिनिटे फ्री कॉलिंग मिळेल. हे लिमिट संपल्यानंतर कॉलिंगसाठी १ पैसा प्रती सेकंद असा चार्ज असेल.
