नवी दिल्ली : आपल्या ४जी हॉटस्पॉटच्या किंमतीत भारती एअरटेलने आता कपात केली आहे. एअरटेलचे ४जी हॉटस्पॉट आता ९९९ रूपयांना उपलब्ध होईल. अॅमेझॉन इंडियावर ऑनलाईन हे हॉटस्पॉट उपलब्ध आहे. एअरटेलचे ४जी सीम यासाठी घेणे गरजेचे आहे. यात तुम्ही पोस्टपेड किंवा प्रीपेड प्लॅन घेऊ शकतात.
४जी हॉटस्पॉटच्या किंमतीत एअरटेलने केली कपात
कंपनीचा ग्राहकांना हाय स्पीड वायफाय सेवा देण्याचा मानस असल्यामुळे तुम्ही कोठेही गेला तर तुमच्यासोबत हाय स्पीड वायफाय असेल. यामध्ये एकावेळी तुम्ही अनेक उपकरण कनेक्ट करू शकता. त्याचबरोबर हॉटस्पॉट देशातील सर्व एअरटेल रिटेल स्टोरमध्ये उपलब्ध आहेत. एअरटेल देशातील २२ दूरसंचार भागात ४जी सेवा देते.