
मुंबई : आपल्या युजर्ससाठी विशेष कॅशबॅक ऑफर रिलायन्स जिओने आणली असून २५ नोव्हेंबर या ऑफरसाठी शेवटची तारीख होती. पण कंपनीने या ऑफरला आता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जिओच्या कॅशबॅक ऑफरला मुदतवाढ
१५डिसेंबरपर्यंत रिचार्ज करणाऱ्यांना आता कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. ३९९ किंवा त्याहून अधिक २५९९ रुपयांपर्यंतच्या रिचार्जवर कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. ऑनलाइन रिचार्जवरच हे रिचार्ज ऑफर उपलब्ध असतील.
तुम्ही जर ३९९ रुपये रिचार्ज केले तर तुम्हाला ४०० रुपये कॅशबॅक मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला ५०-५० रुपयांचे ८ व्हाऊचर मिळतील. ३९९ रिचार्ज केल्यानंतर पुढील आठ रिचार्जवर ५० रुपयांची सूट मिळेल. याचा अर्थ ३९९चे रिचार्ज ३४९ रुपयांना मिळेल. जिओ अॅपवर चारशे रुपयांचे हे व्हाउचर मिळतील. म्हणजे ४०० रुपये थेट अॅपवर मिळतील. ३०० रुपयांचे मोबाईल वॉलेट आणि वाचलेले पैशे शॉपिंग व्हाउचरमध्ये मिळतील.
दुसऱ्या डिजिटल वॉलेटमधून जर तुम्ही रिचार्ज केले तरी तुम्हाला ही कॅशबॅक ऑफर मिळेल. मोबिक्विकवरुन रिचार्ज करतांना जिओच्या नवीन युजर्सला न्यू जिओ कोड टाकावे. यानंतर ३९९च्या रिचार्जवर तुम्हाला ३०० रुपये कॅशबॅक मिळतील. जिओच्या जुन्या युजर्सने जिओ १४९ कोड टाकावा. यामध्ये त्यांना १४९ची कॅशबॅक मिळेल.
