एका युवकाच्या पोटातून काढले २६३ नाणी आणि १२ ब्लेड


नवी दिल्ली : एक विचित्र प्रकार मध्यप्रदेशातील रिवामध्ये समोर आला असून एका युवकाच्या पोटातून रिवामधील संजय गांधी मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी नाणी, खिळे आणि चेन काढले आहेत.

डॉक्टरांच्या एका टीमने शुक्रवारी ३२ वर्षीय तरुणाच्या पोटातून २६३ नाणी, १० ते १२ शेव्हिंग ब्लेड, काचेचे तुकडे, लोखंडी साखळीशिवायही अनेक गोष्टी बाहेर काढल्या आहेत. याबाबत या तरुणाच्या नातेवाईकांनी सांगितले की, धातूच्या वस्तू खाण्याची सवय त्यांच्या मुलाला लागली होती. तो त्यामुळे धातूसदृश्य वस्तू खात असे. तो लहानपणापासूनच लपून-छपून नाणी आणि इतर लोखंडी वस्तू खात असे.

शनिवारी (१८ नोव्हेंबर) रोजी सतना जिल्ह्यातील सोहावल येथे राहणाऱ्या मकसूद या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला गेल्या तीन महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्याची तपासणी सुरु करण्यात आली आणि शुक्रवारी ऑपरेशन करण्यात आले. या तरुणावर गेल्या सहा महिन्यांपासून उपचार सुरु होते. सतनामध्ये सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी त्याला टीबी झाल्याचे म्हणत उपचार सुरु होता. पण परिस्थितीत सुधार होत नसल्याने रिवा मेडिकल कॉलेजमध्ये त्याला आणण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आल्याची माहिती रुग्णाच्या नातवाईकांनी दिली आहे.

Leave a Comment