
न्यूयॉर्क : यूजर्ससाठी आणखी एक नवीन सुविधा सोशल नेटवर्किंग वेबसाईट ट्विटरने सुरू केली असून ट्विटरने या आधी ट्विट करण्यासाठी शब्दमर्यादा वाढवली होती. यूजर्स ट्विटरच्या या सुविधेमुळे सुखावले होते.
ट्विटरने लॉन्च केले ‘बुकमार्क’ फीचर
ट्विटरने आता अजून एक फीचर लॉन्च केले आहे. या फिचरचे नाव बुकमार्क असे असून सध्या त्याचे टेस्टिंग चालू आहे. ३० कोटींहून अधिक ट्विटर युजर्स या फीचरमुळे ट्वीट पुन्हा वाचण्यासाठी सुरक्षित ठेऊ शकतात. याबद्दलची माहिती ट्विटरच्या उत्पादन डिजाईनर टीना कोयामा यांनी ट्वीट करून दिली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, सेवफॉरलेटर टीमकडून बातमी. आमच्या सुविधेला बुकमार्क हे नाव देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कारण या शब्दाचा अर्थ आहे सामग्री सुरक्षित ठेवणे. त्यामुळे हव्या असलेल्य़ा गोष्टी चटकन मिळतात. ट्विटर यूजर्सकडून केल्या गेलेल्या मागणीपैकी ही एक असल्याचे कोयामा यांनी सांगितले.
