जेफ बेझोसने एका दिवसात कमावले १४ हजार कोटी


नवी दिल्ली – ई-कॉमर्समध्ये दिग्गज असलेल्या अॅमेझॉन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांना ब्लॅक फ्रायडेला झालेल्या महासेलने ६.५ लाख कोटी रुपयांचा मालक बनवले आहे. ब्लूमबर्ग यांच्या मते, शुक्रवारच्या ब्लॅक फ्रायडेच्या महासेलनंतर अॅमेझॉनच्या शेअरमध्ये जबरदस्त सुधारणा झाली आणि केवळ एका दिवसात जेफ बेझोस यांनी १४ हजार कोटी रुपये कमावले. याचबरोबर बेझोस यांचे नेटवर्थने जवळपास १०० अब्ज डॉलर्स म्हणजेच ६.५४ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी त्यांची संपत्ती ९७.९ अब्ज डॉलर्स होती.

१९९९नंतर असे पहिल्यांदाच घडले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीची नेटवर्थ १०० अब्ज डॉलर्सहून अधिक झाली आहे. तत्पूर्वी, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि आताचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांची संपत्ती आकड्यांना स्पर्श करू शकते.
रिपोर्टनुसार, या वर्षी अॅमेझॉनच्या शेअर्समध्ये ५८ टक्क्यांची वाढ झाली आहे आणि त्याचमुळे जेफ बेझोस यांच्या संपत्तीदेखील भलीमोठी वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार या वर्षी जेफ यांही कमाई ३४ अब्ज डॉलर्सने वाढली आहे.

अॅमेझॉनचे संस्थापक १९९८ मध्ये कंपनीचे शेअर मार्केटमधील सूचीसह अब्जाधीश बनले. त्यानंतर वॉरेन बफेट हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. आज सुमारे २० वर्षांनंतर, बेझोस यांची मालमत्ता ६५० अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे.

Leave a Comment