एअरटेल देत आहे १९८रुपयात अनलिमिटेड कॉल आणि २८ जीबी डेटा


मुंबई : जिओला टक्कर देण्यासाठी देशातील सर्वात मोठी टेलीकॉम ऑपरेटींग कंपनी एअरटेल दररोज नवनवीन प्लान बाजारात आणत आहेत. त्यात भर म्हणून आता कंपनीने १९८ रुपयांचा नवा प्लान बाजारात आणला आहे. युजर्सला या नव्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डाटा ३ जी आणि ४ जी स्पीडमध्ये मिळणार आहे. २८ दिवसांसाठी १९८ रुपयांचा हा प्लान आहे. हा प्लान सध्या आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या सर्कलसाठी उपलब्ध आहे. दरम्यान या टेरिफ प्लानची अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण माय एअरटेल अॅप्लिकेशनमधील ‘best offer for you’ अंतर्गत हा प्लान मिळवू शकतात. पण हा प्लान काही ठराविक कस्टमरला उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Leave a Comment