२००० हजारांनी स्वस्त झाला हॉनोरचा हा स्मार्टफोन


नवी दिल्ली : आपल्या हॉनोर ८ लाईट या स्मार्टफोनच्या किंमतीत हॉनोर कंपनीने कपात करण्याची घोषणा केली असून यावर्षीच्या मे महिन्यात हॉनोर ८ लाईट हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. त्यावेळी या फोनची किंमत १७,९९९ रुपये होती.

या फोनच्या किंमतीत आता कपात करण्यात आल्याने हा फोन १५,९९९ रुपयात मिळणार आहे. हा फोन ब्लॅक आणि ब्ल्यू या दोन रंगात ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. हॉनोर पी८ लाईट (२०१७) सारखाच हॉनोर ८ लाईट हा स्मार्टफोन आहे. आऊट ऑफ द बॉक्स EMUI ५.० बेस्ड अँड्रॉईड ७.० नूगट वर हा स्मार्टफोन चालतो. ड्युअल हायब्रिड सिम सपोर्ट यामध्ये देण्यात आला आहे. हॉनोर ८ लाईट मध्ये २.५ डी कव्हर्ड ग्लास प्रोटेक्शनसोबत ५.२ इंच फुल एचडी (१०८०X१९२० पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. ४जीबी रॅम या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला असून ६४ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. १२८जीबी पर्यंत ही मेमरी वाढवता येऊ शकते. हॉनोर ८ लाईटमध्ये १२ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये ब्लूटुथ, वाय-फाय सुविधा असून यामध्ये ३९९९mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment