आता आयफोन्समध्ये देखील मिळणार ड्युअल सिमची सुविधा


नवी दिल्ली : युजर्स आयफोन ड्युअल सिम नसल्यामुळे घेणे टाळतात असे समोर आल्यानंतर एक मोठा निर्णय कंपनीने घेतला आहे. भलेही युजर्स दमदार फिचर्समुळे आयफोनच्या प्रेमात पडतात. पण अनेकदा युजर्स या फोनमध्ये ड्युअल सिमकार्ड नसल्याने नाराज होतात.

पण याबाबत प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आयफोन घेणाऱ्यांना लवकरच आयफोनच्या नव्या मॉडल्समध्ये ड्युअल सिमची सुविधा दिली जाणार आहे. प्रसिद्ध विश्लेषक मिंग-ची कुओने आपल्या नोटमध्ये लिहीले आहे की, ड्युअल सिम फिचर २०१८मध्ये येणाऱ्या आयफोनच्या सर्व मॉडल्समध्ये असणार आहे.

असेही म्हटले जात आहे की, नवा आयफोन ड्युअल सिम LTE+LTE कनेक्टिव्हीटीसोबत येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ड्युअल सिम असलेल्या फोन्समध्ये LTE+3G कनेक्टिव्हीटी असते. LTE ट्रान्समिशन स्पीडोबतच ड्युअल स्टॅण्डबाय फिचरही २०१८ मध्ये बाजारात येणाऱ्या आयफोनमध्ये देण्यात येणार असल्याचे कुओने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment