आता जिओच्या फिचर फोनमध्ये देखील चालेल व्हॉट्सअॅप


नवी दिल्ली : रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वीच ४जी फीचर फोन बाजारात लॉन्च केला. रिलायन्सच्या या स्वस्त फोनची लाखो लोकांनी प्री-बुकिंग केली होती. त्याची डिलिव्हरी आता सुरु झाली आहे. त्यानंतर त्याच्या फीचर्सची जोरदार चर्चा सुरु झाली. रिलायन्स जिओच्या फोनमध्ये व्हॉट्स अॅप चालणार नाही, असे तेव्हा बोलले जात होते. हा फोन लाखो लोकांनी खरेदी तर केला मात्र त्याच्या फीचर्सबद्दल अनेकांना माहिती नव्हती.

व्हॉट्सअॅप हे ऑफिशियल अॅप रिलायन्स जिओच्या या ४जी फीचर फोनमध्ये नाही आहे. पण युट्युबवर व्हायरल झालेल्या एका ट्रिकमुळे काही युजर्सना जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालवण्याचा मार्ग सापडला आहे. फोन हातात आल्यावर यात व्हॉट्सअॅप चालणार नसल्याने अनेक युजर्स हैराण होते. पण तुमच्यकडे देखील हा फोन असेल तर तुम्ही अगदी सहज त्यात व्हॉट्स अॅप चालू करू शकता.

त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी जिओ फोनमध्ये ब्राऊजरमध्ये www.browserling.com ओपन करा. आपल्याला ५ प्रकारचे ब्राऊजर्स या वेबसाईटवर मिळतील. त्यात क्रोम सिलेक्ट करा. त्यानंतर वेबसाईटवरील अॅड्रेस बार वर web.whatsapp.com ओपन करा. तेथे तुम्हाला एक क्यूआर (QR) कोड दिसेल. ३ नंबर बटणाने हा कोड झूम करा. आता ज्या फोनमधून तुम्ही व्हॉट्सअॅप चालवता त्यात व्हॉट्सअॅप वेबमध्ये जाऊन QR कोड स्कॅन करा. तुमच्या जिओ फोनमध्ये अशाप्रकारे व्हॉट्सअॅप ओपन होईल. जोपर्यंत तुम्ही लॉगआऊट करत नाही तोपर्यंत यात व्हॉट्सअॅप ओपन राहील. ज्या फोनमध्ये तुम्ही व्हॉट्सअॅप चालवता तो फोन देखील तुमच्या जिओ फोन सोबत ठेवा. लांब गेल्यास इंटरनेट प्रॉब्लेम येऊ शकतो.

Leave a Comment