नवी दिल्ली: आजच्या घडीला आपण अशा अनेक बातम्या वाचल्या आहेत एखादा व्यक्ती आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तसे पाहिले तर लहान आणि मोठ्या वयाच्या स्त्रियांचे असे अफेअर आता ट्रेंड झाला आहे. हाच प्रकार भारतापासून दूर असलेल्या हॉलीवूडमध्ये झाला आहे. ६८ वर्षांचा एक संगीत निर्माता डेविड फोस्टरचे नाव अमेरिकेची प्रसिद्ध अभिनेत्री कॅथरीन मॅकफीसोबत जोडले जात आहे. जिचे वय ३३ वर्ष आहे. पण या गोष्टीचा सुगावा डेव्हिडची मुलगी एरिन फोस्टरला लागतो तेव्हा ती काहीतरी असे करते अवघ्या हॉलीवूडमध्ये बोभाटा होतो. विशेष म्हणजे डेव्हिडची मुलगी ३६ वर्षांची आहे. तर मग चला बघूया काय झाले…
फोस्टरची मुलगी एरिनला ही गोष्ट माहीत झाली तेव्हा तिने आपल्या इंस्टाग्राम फोटो स्टोरीमध्ये त्या दोघांचा फोटो टाकला आणि त्याने तिने असे काही लिहिले जे हैराण करणारे होते. त्यात असे लिहिले होते की, मी माझ्या नवीन आईविषयी खूप उत्साहित आहे आणि तेव्हापासून डेव्हिड फॉस्टर आणि कॅथरीन यांच्यातील संबंधांबद्दल चर्चा सुरू झाली. त्यानंतर एरिनने एएनईईएसला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते, आमचे बाबा आनंदी तर आम्ही देखील आनंदी आहोत, कॅथरीन आम्हाला खूप आवडते.
कॅथरीनने एका आरोग्य विषयक पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले, लोकांना काही बोलू द्या, मला डेव्हिड आवडतो. कारण तो एक विलक्षण व्यक्ती आहेत. मी त्याला तो २१ वर्षांचा असताना प्रथम भेटले होते. माझ्या पहिल्या गाण्याचे निर्माण त्यानेच केले होते. तो बराच चांगला आहे. पण अद्याप डेव्हिडकडून या वृत्ताबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.