
आपल्या शरिरासाठी दारुचे अतिसेवन अत्यंत धोकादायक असल्याचे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण जर एखाद्या व्यक्तीला दारुचे व्यसन जडले तर ते सोडवणे खुप अवघड होऊन बसते. अनेक उपायही दारुची सवय सोडण्यासाठी केले तरी लवकर सुटत नाही. पण असेही काही लोक आहेत दारु पासुन ज्यांनी सुटका मिळवली आहे. पण त्यासाठी संयम आणि धैर्याची आवश्यकता असते.
दारुचे व्यसन कमी करण्यासाठी या गोष्टी फॉलो करा
जास्त वेळ कुठल्याही नशेची सवय लागण्यासाठी लागत नाही. पण एक अशी वेळ येते ज्यानंतर नशा करणारी व्यक्ती ही नशेच्या आहारी जाते. अशावेळी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही यावर नियंत्रण कसे मिळवाल. जर दारु पिण्याची सवय तुम्हालाही लागली आहे आणि ती सोडवायची आहे तर सर्वात आधी तुम्हाला सकारात्मक बनण्याची गरज आहे. दारु सोडण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पण तुमची इच्छाच नसेल तर तुम्ही दारूपासून तुमची सुटका करुन घेऊ शकत नाहीत. आज आम्ही तुमच्यासाठी दारु सोडण्याचे काही खास उपाय घेऊन आलो आहोत.
१) तुम्हाला दारुचे व्यसन सोडण्यासाठी तुमचे मन आणि डोके एखाद्या दुस-या कामामध्ये गुंतवा. तुम्ही तुम्हाला स्वत:ला दुस-या एखाद्या कामात गुंतवण्यासाठी एखादे पुस्तक वाचु शकता किंवा पार्कमध्ये फिरु शकता.
२) कितीही वाईट वेळ आपल्यावर आली तरी आपल्यासोबत आपला परिवारच असतो. तुम्ही तुमच्या परिवारासोबत वेळ घालवू शकता, त्यांच्यासोबत बसुन तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स शेअर करु शकता.
३) दारुची चव आणि साखरेची चव यामधील अंतर काही लोकांना समजत नाही. अशावेळी तुम्ही जर दारुच्या व्यसनापासून त्रस्त आहात तर अतिरिक्त प्रमाणात साखरही घेऊ शकता.
४) भुक लागल्यानंतर काही लोकांना दारु पिण्याची आवड निर्माण होते. तुम्ही अशावेळी प्रयत्न करु शकता की तुमचे पोट कधीही खाली असु नये. यासोबतच सहा ते आठ ग्लास पाणी प्रतिदिन प्यावे.
