हा आहे भिकारी करोडपती, जो देतो सर्वांना कर्ज


तुम्हाला एका अशा व्यक्तीसंदर्भात आज आम्ही सांगणार आहोत जो एक भिकारी आहे. पण इतर भिकाऱ्यापेक्षा हा भिकारी थोडा वेगळा आहे. कारण हा भिकारी एक करोडपती आहे. बसला ना धक्का… होय पण हे सत्य आहे…

फक्त भिक मागत नाही तर गरजु लोकांना हा भिकारी कर्ज देतो आणि तेही कमी व्याजदरामध्ये. हे वाचुन नक्कीच तुम्हाला धक्का बसला असेल पण तुम्हाला आज आम्ही या भिका-यासंदर्भात काही खास माहिती सांगणार आहोत.

पप्पू असे या भिका-याचे नाव असुन तो बिहारची राजधानी पाटणा येथे राहतो. तुम्हाला पप्पूच्या संपत्तीबद्दल ऐकुण धक्काच बसेल. पप्पूकडे १.२५ कोटी रुपयांची संपत्ती असल्यामुळे हा एक करोडपती भिकारी आहे. तुम्हाला हा भिकारी पाटणामधील कुठल्याही गल्लीत भिक मागताना दिसेल. पप्पूचे स्वत:चे एक नाही तर तब्बल चार-चार बँक अकाऊंट्स आहेत.

भिक मागण्याआधी पप्पू हा एक चांगला आणि स्वस्थ मुलगा होता. पप्पूला इंजिनिअर बनायचे होते. पण एका दुर्घटनेमध्ये पप्पूच्या स्वप्नांवर पाणी फिरले. पप्पूने यानंतर स्वत:च्या संगोपणासाठी आपली संपत्ती विकली. पप्पूला मग एके दिवशी कल्पना सुचली की आपल्या तुटलेल्या हात आणि पाय याच्या आधारावर आपण भिक मागु शकतो. त्याने मग भिक मागण्यास सुरुवात केली. पप्पू सध्या पाटणा रेल्वे स्थानकावर भिक मागतो.

रेल्वे स्थानकावरील भिका-यांना आरपीएफ रोज बाहेर काढत असते. पण पप्पू तरीदेखील नेहमी तेथेच जात असे, या दरम्यान एके दिवशी पप्पूला आरपीएफ अधिका-यांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांना पप्पूकडून ४ ते ५ एटीएम कार्ड्स मिळाले यामध्ये जवळपास ५ लाख रुपये बँलेंस होते. पोलिसांनी यानंतर अधिक चौकशी केली असता पप्पूने मान्य केले की तो एक करोडपती आहे.

अनेक लहान-मोठ्या व्यापा-यांना पप्पूने १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलेले आहे. पप्पूच्या उपचारासंदर्भात आरपीएफने विचारले तर त्याने सांगितले की जर माझ्यावर उपचार झाले तर मग मी भिक कसा मागणार. यावरुन स्पष्ट होते की पप्पू गरज आहे म्हणून भिक मागत नाही तर भिक मागणे हा पप्पूचा एक व्यवसाय आहे.

Leave a Comment