‘हा’ पठ्ठा वळवतो घुबडाप्रमाणे मान


कराची : घुबडाप्रमाणे १८० अंशात मान तुम्हा-आम्हाला वळवता आली असती तर आपल्याला बसल्या जागी पाठीमागचेही सहज रित्या बघता आले असते. पण पाकिस्तानात असा एक मुलगा आहे जो १८० अंशांत आपली मान वळवू शकतो. विश्वास नाही बसत ना…

मोहम्मद समीर असे या करामती मुलाचे नाव असून अवघ्या १४ वर्षाचा तो आहे. आपल्या हातांचा आधार घेत समीर आपली मान पूर्ण मागे पाठीकडे वळवतो. तो अशा पद्धतीने आपली मान वळवण्यासाठी खूप प्रॅक्टिसही करत असतो.

याबाबत मोहम्मद समीर सांगतो की, मी ६-७ वर्षांचा असताना हॉलिवूड चित्रपटात एका अभिनेत्याचा स्टंट पाहिला होता, तो ज्यात आपली मान मागे वळवतो. मला हे फारच आकर्षक वाटल्याने मी त्याची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. काही महिन्यानंतर मी यात यशस्वी झालो. मी असे करताना आईने पाहिले मला थोबाडीत मारली. पण तिलाही नंतर माझी कला म्हणजे ईश्वराची देण असल्याचे पटले. माझी देखील त्या अभिनेत्याप्रमाणे हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे मोहम्मद समीर याने सांगितले.

Leave a Comment