भारतात आहेत २.१८ लाख कोट्याधीश


नवी दिल्ली – एका नवीन अहवालातून देशातील कोट्याधीशाची संख्या वाढत असल्याचे समोर आले असून भारत आशिया पॅसिफिक भागात कोट्याधीशांच्या संख्येत चौथ्या स्थानावर आहे. तब्बल २.१८ लाख कोट्याधीश देशात असून ८७७ अब्ज डॉलर्स त्यांची संपत्ती असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

हा अहवाल केपजेमिनी, इंडियाने २०१७ एशिया पॅसिफिकने प्रसिद्ध केला. एक दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे त्यांनी घोषित केले आहे, या यादीत त्यांचाच समावेश करण्यात आला. आशिया-पॅसिफिकमध्ये २०१६च्या अखेरीस २८.९१ लाख कोट्याधीशांसह जपान प्रथम स्थानी, दुस-या स्थानी चीन असून ११.२९ लाख आणि ऑस्टेलियामध्ये २.५५ लाख कोट्याधीश होते. देशातील कोट्याधीशांची संख्या २०१५ ते २०१६ या कालावधीत ९.५ टक्क्यांनी वाढली. आशिया पॅसिफिक प्रांताची सरासरी वार्षिक दर ७.४ टक्के आहे. चीन आणि जपानमध्ये याच कालावधीत अनुक्रमे ९.१ आणि ६.३ टक्क्यांनी वाढ झाली. देशातील आर्थिक विकास २०१७-१८ या आर्थिक वर्षांत वेगाने होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment