होन्डाची ग्राजिया लॉन्च


स्कूटरच्या मार्केटमधील आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी होन्डाने भारतीय बाजारामध्ये आणखी एक स्कूटर लॉन्च केली आहे. याच्या बुकिंगला २५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली होती. पण स्कूटरची किंमत आणि फिचर्सबाबत गुप्तता पाळण्यात आली होती.

होन्डाच्या ग्राजिया स्कूटरमध्ये एलईडी हेडलाईट देण्यात आली आहे. १२४.९ सीसीचे ४ स्ट्रोक इंजिन या स्कूटरमध्ये आहे. स्कूटरमध्ये सेल्फ स्टार्ट आणि किक स्टार्ट असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. स्कूटरचा व्हील बेस १२६० एमएम एवढा आहे. तर स्कूटरची किंमत ५७,८९७ रुपये एवढी असण्याची शक्यता आहे.

ग्राजिया स्कूटरमध्ये १२ इंचाचे ब्लॅक अलॉय व्हील, फ्रंट डिस्क ब्रेक आणि टेलीस्कॉपिक फ्रंट सस्पेंशनसारखे फिचर्स आहेत. याचबरोबर डिजीटल डिस्प्ले, डाव्या बाजूला स्टोरेज स्पेसही देण्यात आला आहे. होन्डा ग्राजियाची स्पर्धा अॅक्टीव्हा १२५, सुजुकी एक्सेस १२५, वेस्पा वीएक्स १२५ आणि महिंद्रा गुस्टो १२५ बरोबर होणार आहे. सहा रंगांमध्ये होन्डा ग्राजिया उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment