नेहमीच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी कमी होण्याची शक्यता


नवी दिल्ली : येत्या आठवड्यात जीएसटी परिषदेच्या होणाऱ्या बैठकीत नेहमीच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा विचार होणार आहे. गुवाहाटी येथे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील ही बैठक ९ आणि १० नोव्हेंबरला होणार आहे. या बैठकीत हाताने बनवलेले फर्निचर, प्लास्टिक उत्पादने, शाम्पू अशा वस्तूंवरील कराचा फेरविचार केला जाणार आहे.

तब्बल २८ टक्के जीएसटी लावल्याने रोजच्या वापराच्या अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. यामुळे लघु आणि मध्यम उद्योजकांचे खूप नुकसान होत आहे. परिणामी अशा जीएसटीचा मोठा फटका बसलेल्या उद्योगांतील करप्रणाली तर्कसंगत बनवण्यासाठी जीएसटी परिषद काम करत आहे. जीएसटी येण्या अगोदरपासूनच या उद्योगांना मूल्यवर्धित कर, उत्पादन शुल्कातील दरात सूट आदी गोष्टींमुळे त्रास सहन करावा लागत होता. जीएसटी १ जुलैपासून लागू झाला आहे. तेव्हापासून दर महिन्याला जीएसटी परिषद बैठक घेते. जीएसटी लागू झाल्यानंतर त्यात अनेक ग्राहक हिताचे बदल करण्यात येत आहेत.

सरसकट सर्व प्रकारच्या फर्नीचरला २८ टक्के जीएसटी लागू केला गेला. पण, लाकडी फर्निचरचे अधिक काम असंघटित क्षेत्रात होते आणि मध्यमवर्गाकडून याचा वापर केला जातो. याचप्रकारे प्लास्टिक उत्पादनांवरदेखील २८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.

Leave a Comment