९१ वर्षांच्या महिलेसोबत २३ वर्षाच्या मुलाने केले लग्न


अर्जेंटीनात चक्क एक अनोखा विवाह पहायला मिळाला असून यातील वर अवघ्या २३ वर्षांचा युवक आहे . तर, चक्क ९१ वर्षांची महिला वधू आहे. एकमेकांना दोघेही परिचीत असून, ते गेली अनेक वर्षे एकमेकांना ओळखतात. दोघे काही वर्षे एकत्र राहिले आहेत. पण त्यांच्या लग्नाबाबत आता कायदेशीर प्रश्न उपस्थित केले जात असल्यामुळे हे प्रकरण आता थेट न्यायालयात पोहोचले आहे.

या युवकाचे नाव माऊरिसियो ओसौला असे असून वृद्ध महिलेचे नाव योलांद टारेज असे आहे. २०१५ मध्ये दोघांनी लग्न केले. योलांदचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. कोणाला त्यांच्या या विवाहाबद्धल फारशी कल्पना नव्हती. पण माऊरिसियोने योलांदच्या मृत्यूनंतर आपण तिचा पती असल्याने तिची उर्वरीत पेन्शन आपल्याला मिळावी अशी मागणी सरकारकडे केली. अधिकाऱ्यांनी त्यानंतर माऊरिसियोच्या मागणीवर आक्षेप घेतला. दरम्यान, हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ असून केवळ स्वार्थापोटी योलांदा या महिलेसोबत माऊरिसियोने विवाह केल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.