आपल्याकडे २७ कोटी फेक अकाऊंट असल्याचे फेसबुकने केले मान्य


लंडन : अमेरिकेतील २०१६मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुकची भूमिका रशियाच्या हस्तक्षेपावरुन आधीच संशयाच्या भोवऱ्यात आहे. पण आता त्यातच एक नवी माहिती समोर आली आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवर २७ कोटी फेक अकाऊंट सुरु असल्याचे फेसबुकने मान्य केले आहे.

यासंदर्भातील वृत्त द टेलीग्राफने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, गेल्याच आठवड्यात आपल्या त्रैमासिक उत्पन्नाचे आकडे फेसबुकने जाहीर केले होते. त्यानुसार, दहा लाख पटीने जास्त बनावट खाती (फेसबुकवर) असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

ऑक्टोबरमध्ये असेच वृत्त द वॉशिंग्टन पोस्टने ही प्रकाशित केले होते. त्यानुसार, सिनेटर्सना फेसबुकने सांगितले होते की, रशियाचे उत्पादित आणि वितरित साहित्य त्यांच्या १२.६ कोटी यूझर्सनी पाहिले असेल. आधीच्या माहितीपेक्षा फेसबुकची ही माहिती देखील कित्येक पट जास्त होती. कारण, सुरुवातीला फेसबुकने सांगितले होते की, अशा जाहिराती जवळपास १० लाख यूझर्सनी पाहिल्या होत्या.

Leave a Comment