
नवी दिल्ली : आपल्या गस्टो स्कूटरचे नवे मॉडेल महिंद्रा कंपनीने बाजारात आणले आहे. या स्कूटरचे नाव गस्टो आरएस असे आहे.
या स्कूटरची नवी दिल्लीत किंमत ४८ हजार १८० रूपये ऐवढी आहे. आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत डिझाईनमध्ये गस्टो आरएसमध्ये बदल करण्यात आले आहेत. मात्र कोणताही बदल इंजिनमध्ये करण्यात आलेला नाही.

ड्यूअल टोन पेंटजॉब महिंद्रा गस्टो आरएस एडिशन स्कूटरमध्ये बघायला मिळेल. दोन रंगांमध्ये ही स्कूटर उपलब्ध होईल. यात लाल-पांढरा आणि निळा-पांढरा या रंगांचा समावेश आहे. महिंद्राची ही गाडी पेटीएम अॅपवरून खरेदी केल्याच ६ हजार रूपयांची कॅशबॅक ऑफरही देण्यात येत आहे. मात्र ही ऑफर केवळ २० ऑक्टोबरपर्यंतच असेल. महिंद्राच्या या नव्या स्कूटरमध्ये गस्टोसारखेच १०९ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले गेले आहे. ८ बीएसपीची पावर आणि ९ न्यूटन मीटरचा टॉर्क हे इंजिन जनरेट करते. या इंजिनला सीव्हीटे ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
महिंद्राने आणले गस्टो स्कूटरचे नवे मॉडेल
महिंद्रा गस्टो आरएसमध्ये सस्पेंशनसाठी फ्रन्ट व्हिलमध्ये एअर स्प्रिंग्ससोबतच टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागे हायड्रॉलिक शॉक अब्जॉर्बर्स दिले गेले आहेत. यात १२ इंचाचे अलॉय व्हिल दिले आहेत. तसेच यात जास्तीत जास्त ६ लीटर इंधन भरले जाऊ शकते. कंपनीने मायलेजबाबत दावा केला आहे की, ही स्कूटर एक लीटरमध्ये ६३ किलोमीटर चालते.
