
मुंबई : मायक्रोमॅक्सने रिलायन्स जिओचा ४जी फीचरफोनला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलच्या साथीने ‘भारत-१’ हा नवा 4जी फोन नुकताच लाँच केला आहे. हा फोन 50 कोटी फोन यूजर्सच्या गरजा लक्षात ठेऊन लाँच केल्याचे लाँचिंगवेळी कंपनीने म्हटले आहे. अनेक यूजर्सला भारत-१ या फोनमुळे बराच फायदा होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. दरम्यान ग्राहकांना बीएसएनएलच्या ९७ रुपयांच्या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा या फोनवर मिळणार आहे.

आजही भारतातील अनेक लोक इंटरनेटपासून दूरच आहेत. इंटरनेटशी त्याच लोकांनी जोडले जावे अशी कंपनीची इच्छा आहे. मायक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मा म्हणाले की, देशातील प्रमुख टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस प्रोवाइडर बीएसएनएल ही आहे. देशातील कानकोपऱ्यात याचे नेटवर्क हे पोहचले आहे.
बीएसएनएलच्या साथीने मायक्रोमॅक्सने लाँच केला ‘भारत-१’ ४जी फोन
दरम्यान, बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव म्हणाले की, आमच्यासाठी मायक्रोमॅक्ससोबत भागीदारी करणे ही अभिमानाची बाब आहे. मायक्रोमॅक्स ही एक भारतीय कंपनी आहे. भारताच्या विकास प्रक्रियेत जिचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मायक्रोमॅक्सचे आतापर्यंत १५ कोटी यूजर्स ग्राहक आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आम्हाला आशा आहे की, भारत-१ सोबत यूजर्सला डेटा आणि कॉलिंगचा एक वेगळा अनुभव नक्कीच मिळेल.
