
मुंबई : आता आयडिया आणि एअरटेल या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी रिलायन्स जिओच्या प्रत्येक टेरिफ प्लॅनला टक्कर देण्यासाठी नवनवे प्लॅन लाँच केले आहेत. आयडिया आणि एअरटेलने जिओच्या ३९९ रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी ४९५ रुपये किंमतीचा नवा प्लॅन आणला आहे.
जिओला टक्कर देणार एअरटेल-आयडियाचा नवा प्लॅन!
यूजर्सला या नव्या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. हा प्लॅन ८४ दिवसांसाठी वैध असणार आहे. ज्यामध्ये ८४ जीबी डेटा मिळणार आहे. एअरटेल आणि आयडियाच्या या प्लॅनमध्ये दररोज ३०० मिनिट आणि एका आठवड्यात १२०० मिनिटांपर्यंत फ्री कॉलिंग आहे. नव्या प्रीपेड यूजर्ससाठी हा प्लॅन असणार आहे. एअरटेलने याशिवाय ५४९ आणि ९९९ रुपये किंमतीचे दोन नवे प्लॅनही लाँच केले आहेत. ज्यामध्ये अनुक्रमे २जीबी आणि ४ जीबी डेटा दररोज मिळणार आहे.
