गुजरातमधील जनतेचे अच्छे दिन सुरु; पेट्रोल-डिझेल तीन रूपयांनी स्वस्त


गांधीनगर : केंद्र सरकारच्या सुचनेनंतर गुजरात सरकारनेही महाराष्ट्रापाठोपाठ पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली असून ४ टक्क्यांनी गुजरात सरकारने व्हॅटमध्ये कपात केल्यामुळे पेट्रोल २.९३ रूपये तर डिझेल २.७२ रूपयांनी स्वस्त झाले आहे.

याबाबतची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केल्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोन रूपयांनी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज डय़ुटी कमी केल्यानंतर सर्व राज्यांनाही व्हॅटमध्ये कपात करण्यासाठी पत्र पाठवले होते. महाराष्ट्र आणि गुजरातने आतापर्यंत केंद्राच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. देशभरात पेट्रोलचे वाढले आहेत. मुंबई पेट्रोलचे दर जवळपास ८० रूपयांच्या घरात आहेत .त्यामुळे सरकावर चौफेर टीका केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक्साईज डय़ुटी दोन रूपयांनी कमी करत मोठा दिलासा दिला आहे.

Leave a Comment