तीन तासांपेक्षा जास्त उशीरा ट्रेनला झाला तर परत मिळणार तिकीटाचे पैसे


मुंबई : आता ऑनलाईन तिकीट बूक करणाऱ्यांनाही ट्रेन तीन तासांपेक्षा जास्त उशीरा आली तर त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. ही सुविधा फक्त याआधी फक्त तिकीट खिडकीवरून तिकीट काढणाऱ्यांनाच मिळत होती. रेल्वेकडून ऑनलाईन तिकीट बूक करणाऱ्यांसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.

तीन तासांपेक्षा जास्त उशीर ट्रेनला झाल्यावर प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट रद्द केले तर तिकीटाचे अर्धे पैसे प्रवाशांना लगेचच परत मिळणार आहेत. उरलेली ५० टक्के रक्कम प्रवाशाच्या प्रवासाची माहिती मिळाल्यावर मिळेल. ई-तिकीटचे पैसे परत मिळवण्यासाठी आयआरसीटीसीच्या टीडीआर ऑप्शन सिलेक्ट करावा लागणार आहे. टीडीआर ऑप्शन सिलेक्ट केल्यावर प्रवाशाला त्याच्या तिकीटाचा पीएनआर नंबर आणि यात्रेबद्दलची अन्य माहितीचा फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म भरल्यावर बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज प्रवाशाला मोबाईलवर येईल. तसेच तुमच्या रजिस्टर ई-मेल आयडीवरही याबाबतचा एक मेल येईल.

Leave a Comment