सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ बनला गॅझेट ऑफ द इयर


सॅमसंगच्या फ्लॅगशीप स्मार्टफोन गॅलॅक्सी नोट आठने गुरूवारी सुरू झालेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस २०१७ मध्ये गॅजेट ऑफ द इयर सन्मान मिळविला आहे. या फोनसाठी बिक्सबी, डिजिटल असिस्टंट, एस पेन विकसित स्वरूपात दिले गेले आहे. १२ सप्टेंबरला लाँच झालेला हा फोन बाजारात ६७९०० रूपयांत उपलब्ध आहे.

कंपनीचे वरीष्ठ उपाध्यक्ष आसिम वारसी म्हणाले, नोट एट मुळे भारतात प्रिमियम स्मार्टफोन क्षेत्रात आमचे नेतृत्त्व मजबूत झाले आहे. आमच्या मेहनतीचे हे फळ आहे. या फोनसाठी ६.३ इंची स्क्रीन, एस पेन, रिअरला १२ एमपीचे दोन कॅमेरे, त्यातील एक वाईड तर दुसरा टेलिफोटो लेन्ससह आहे. ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझर मुळे फोटो अतिशय क्लिअर येण्यास मदत मिळते. फोनला ३३०० एमएएच ची बॅटरी, वायरलेस चार्जिंग, ६ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज व अँड्राईड नगेट ७.१.१ ओएस दिली गेली आहे.