नुकत्याच लाँच केलेल्या आयफोन ८ प्लसचा स्फोट


नवी दिल्ली – गेल्याच महिन्यात अॅपलने मोठा गाजावाजा करत आयफोन ८, ८ प्लस आणि आयफोन एक्स लाँच केला. या फोनला जगभरातील अॅपलप्रेमींनीही चांगलीच दाद दिल्याचे दिसून आले. पण आता नव्या आयफोन ८ च्या बॅटरीत काही गडबड असल्याचे सांगण्यात येत असून कंपनीसाठी सध्या हा नवा आयफोन ८ हा फोन डोकेदुखी ठरत आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयफोन ८ प्लस या स्मार्टफोन स्फोटाच्या दोन घटना घडल्या आहेत. यापैकी एक घटना ही तैवान येथे तर दुसरी जपान येथे घडली. सोशल मीडियावर सध्या आयफोन ८ चा स्फोट झाल्याची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. फोनची अॅल्युमिनियम फ्रेम ही फोनपासून वेगळी झाल्याचे या छायाचित्रात दिसत.

तैवानमधील वू यू या महिलेने सांगितले की, आयफोन ८ प्लस (६४जीबी) हा फोन तिने विकत घेतला. अॅपलचाच ओरिजनल चार्जर फोन चार्ज करण्यासाठी वापरला आणि या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. दरम्यान, अॅपलकडून या घटनेची दाखल घेण्यात आली आहे. त्यांनी फोन परत मागवला असून या घटनेमागचा ते शोध घेत आहेत.

दरम्यान, याच समस्येला जपानच्या एका व्यक्तीलाही सामोरे जावे लागले. स्फोटामुळे या ग्राहकाने खराब झालेल्या आयफोन ८ प्लसचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. तेथे देखील तैवानमध्ये झालेल्या घटनेसारखीच घटना घडली. ही बॅटरीचीच समस्या असल्याचा दावा अनेक टेक्नो वेबसाईटने केला आहे.

Leave a Comment