
मुंबई : टेलिकॉम कंपनी आयडिया देखील रिलायन्स जिओला टेरिफ प्लॅनमध्ये टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. आयडियानेयासाठी एक नवा प्लॅन लाँच केला असून हा प्लॅन आयडियाने आपल्या प्री-पेड यूजर्ससाठी आणला आहे. यूजर्सला ज्यामध्ये ८४ दिवसांसाठी १२६ जीबी डेटा मिळणार आहे.
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आयडियाचा नवा प्लॅन
या प्लॅनची माहिती आयडिया सेल्यूलरच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या माहितीनुसार, या प्लॅनची किंमत ६९७ रुपये आहे. ज्यामध्ये ८४ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा यूजर्सला मिळणार आहे. यासोबतच लोकल-एसटीडी अनलिमिटेड कॉलिंगही असणार आहे. एअरटेल आणि जिओने देखील ८४ दिवसांसाठीचे प्लॅन याआधीच लाँच केले आहेत. यूजर्सला ज्यामध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. पण त्या प्लॅनची किंमत ३९९ रुपये आहे.
