या कार्स बुलेट ट्रेनपेक्षाही वेगवान


अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन ची पायाभरणी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदबादेत नुकतीच पार पडली. ही ट्रेन सुरू झाली की अहमदाबाद मुंबई प्रवास तीन तासांत पूर्ण होणार आहे. मात्र वाहन उदयोगाने यापूर्वी बुलेट ट्रेन पेक्षाही वेगाने जाणार्‍या कार्स तयार केल्या असून त्या हाच प्रवास अवघ्या ७५ ते ९० मिनिटांत करू शकतात. कोणत्या आहेत या कार्स?

हेनेसे व्हेनोम जीटी- ही कार प्रथम २०१० साली लाँच केली गेली. आजही ती निवडक सुपरकार पैकी एक गणली जाते. गतवर्षी केनेडी स्पेस सेंटर मध्ये तिने ताशी २७०.४ मैल म्हणजे ४३४ किमीचा वेग घेतला. अर्थात हा वेग एकाच दिशेने असल्याने गिनीज बुकने त्याची रेकॉर्ड म्हणून नोंद घेतली नाही. मात्र ही सर्वात वेगवान कार १३.६ सेकंदात ० ते ३०० किमीचा वेग गाठण्यात यशस्वी ठरली.


बुगाटी चेरॉन- बुगाटीने वेगाबाबत त्यांच्या कार्सची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करण्यात यश मिळविले आहे .त्यांच्या नव्या चेरॉनने ४१.९६ सेकंदात ४०० किमीचा वेग गाठला व जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित केले. या कारचा टॉप स्पीड आहे ताशी ४२० किमी. ही चाचणी जर्मनीच्या टॉप सिक्रेट इहरा लेसिन टेस्ट ट्रॅकवर घेतली गेली. माजी फॉर्म्युला वन स्टार जुआन पाब्लो मान्टेने ही चाचणी घेतली. या कारची फक्त ५०० युनिट बनविली जाणार असून त्यातील ३०० अगोदरच बुक झाली आहेत.


एसएससी अल्टीमेट एरो- शेब्ले सुपरकार अल्टीमेट एरो ही जागातील फास्टेस्ट प्रॉडक्शन कार खिताबाने सन्मानित असून हा खिताब तिला २००७ सालीच मिळाला आहे. या कारनेही ताशी ४११.९९ किमीचा वेग गाठला होता.


कोनिगसिग- बुगाटी वेरॉन कारने जगातील सर्वात वेगवान कारचा खिताब मिळविण्यापूर्वी हा खिताब स्वीडनच्या सुपरकार कंपनी कोनिगसिगने मिळविला होता तोही २००५ सालात. त्यांच्या या कारने ताशी ३८९ किमी स्पीड गाठला होता. या कारला ४.७ लिटरचे व्ही ८ इंजिन दिले गेले आहे.


लोंबार्गिनी अॅव्हेंटेडोर- वा वेगवान कारचा स्पीड ताशी ३५० किमी आहे. म्हणजेच भारतात धावणार्‍या बुलेट ट्रेनचा आणि तिचा वेग सारखाच आहे. ही कार २.९ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग घेते.

Leave a Comment