
मुंबई : जिओने देशाच्या टेलिकॉम क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर इतर कंपन्यांनीही आता जिओला टक्कर देण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत. आता यातच सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी बीएसएनएलने देखील आपली ५जी सेवा लॉन्च करण्याची तयारी चालवली आहे. तसेच लवकरच बीएसएनएलकडून ४ जी VoLte सेवाही दिली जाणार आहे.
बीएसएनएल लवकरच लॉन्च करणार ४जी VoLte आणि ५ जी सेवा
आपल्या आगामी योजनांची माहिती बीएसएनएलचे संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. यात मागच्याच वर्षी बीएसएनएलने सरकारकडे ७०० मेगाहर्टझच्या स्पेक्ट्रमची मागणी केली होती. लवकरच बीएसएनएलला ४जी VoLte आणि ५जी साठी स्पेक्ट्रम मिळण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. बीएसएनएलला स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी सर्वात जास्तीच्या बोलीच्या किंमतीची बरोबरी करावी लागेल. मात्र लिलावामध्ये भाग घेण्याची बीएसएनएलला आवश्यकता नसेल.
