
नवी दिल्ली : एअरटेल कंपनी आता रिलायन्स जिओच्या स्वस्त फोनला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली असून १५०० रुपयांच्या डिपॉझिटवर रिलायन्स जिओने ४जी फिचर फोन देण्याची घोषणा केली आणि सर्वांचेच धाबे दणाणले. त्यानंतर टेलिकॉम कंपन्यांसोबतच मोबाईल कंपन्यांनाही एक झटका बसला आहे.
एअरटेल देणार २५०० रुपयांत ४ जी फोन
मात्र, आता भारती एअरटेल कंपनी रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आपला फोन बाजारात आणणार आहे. एअरटेलने ४जी मोबाईल फोनची निर्मिती करण्याची तयारी सुरु केली आहे. एअरटेलच्या या ४जी मोबाईल फोनची किंमत २५०० ते २७०० रुपयांपर्यंत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअरटेलचा हा फोन दिवाळीपूर्वी बाजारात लॉन्च होऊ शकतो. त्याचबरोबर एअरटेल या फोनसोबतच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध डेटा आणि वॉईस कॉल्स लॉन्च करणार आहे.
