आयकर विभागाच्या रडारवर ७ खासदार, ९८ आमदार


नवी दिल्ली – लोकसभेचे ७ खासदार आणि देशभरातील ९८ आमदार उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीच्या संशयावरुन आयकर विभागाच्या रडारवर असून सर्वोच्च न्यायालयाला याबद्दलची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) दिली. मोठ्या प्रमाणात ७ खासदार आणि ९८ आमदारांच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सीबीडीटीने सांगितले आहे. खासदार, आमदार यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला संपत्तीत बेहिशेबी वाढ झालेल्या खासदार आणि आमदारांची यादी सादर करण्यात येणार असून ही यादी बंद लिफाफ्याच्या माध्यमातून सादर करण्यात येणार असल्याची माहिती सीबीडीटीने दिली आहे. लोकप्रतिनिधींच्या संपत्तीचा प्राथमिक तपास आयकर विभागाकडून सुरु करण्यात आला असून दरम्यान या तपासातून लोकसभेच्या खासदारांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाल्याचे समोर आल्याचे सीबीडीटीने सांगितले आहे. खासदारांची संपत्ती प्रचंड वाढली असून आमदारांच्या संपत्तीतदेखील चांगलीच वाढ झाली असल्याची माहिती सीबीडीटीने दिली आहे.

Leave a Comment