सोशल मीडियावर दाखवाल श्रीमंती तर पडेल महागात


मुंबई : इन्स्टाग्रामवर किंवा फेसबुकवर महागड्या वस्तूंचे फोटो अपलोड केले तर तुम्हाला आता महागात पडू शकते. कारण काळा पैसा शोधण्यासाठी आता आयकर विभागाची सोशल नेटवर्किंग साईटवर करडी नजर असणार आहे.

पुढील महिन्यापासून ‘प्रोजेक्ट इनसाईट’ आयकर विभाग सुरु करणार आहे. आयकर विभाग यामध्ये संबंधित व्यक्तीची सर्व माहिती आणि सोशल नेटवर्किंग साईटवरील माहिती पडताळणार आहे. त्याद्वारे संबंधित व्यक्तीचा खर्च आणि घोषित उत्पन्नामधील फरक तपासून पाहिला जाईल. आयकर विभागाने हे करचोरी रोखण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाऊल उचलले आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयकर आणि संपत्तीच्या माहितीसाठी ८ क्रमांकाच्या पानावर आयकर विभागाने पॅन कार्ड आधारशी जोडणे अनिवार्य केले आहे.

मागील वर्षी ‘प्रोजेक्ट इनसाईट’ च्या अंमलबजावणीसाठी आयकर विभागाने एलअँडटी इन्फोटेकसोबत करार केला होता. सध्या ‘प्रोजेक्ट इनसाईट’चे बीटा परीक्षण सुरु असून त्याची सुरुवात पुढील महिन्यात होईल. याद्वारे आयकर विभागाला मोठ्या व्यवहारांची माहिती मिळेल आणि काळ्या पैशांवर अंकुश ठेवण्यास मदत होईल.

Leave a Comment