
मुंबई : टीम फेसबुक सध्याच्या घडीला फेसबुक अधिक युजर फ्रेंडली कसे होईल याकडे अधिक लक्ष देत असून फेसबुककडून दर महिन्याला नवीन फीचर्स आणून युजर्सना त्यांची सवय लावण्याचा प्रयत्न केला जातो. आता लवकरच अजून एक कलरफूल फीचर फेसबूकवर दिसण्याची शक्यता आहे.
फेसबुकवर लवकरच दिसणार नवे कलरफूल फीचर
फेसबुकने काही दिवसांपूर्वी फेसबुकवर स्टेटस टाकताना त्यामागे काही कलरफूल टेम्पलेट्स ठेवण्याचा पर्याय दिला. यामध्ये थीम वॉलपेपर्सचाही समावेश करण्यात आला आहे. पण असाच बदल आता कमेंट बॉक्समध्ये येणार आहे. फेसबुकच्या या नव्या फीचरची माहिती ‘द नेक्स्ट वेब’ने दिली आहे.
फेसबुक कलरफुल कॉमेंट बॉक्सनंतर आणखी एक फीचर आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती ‘द नेक्स्ट वेब’ने दिली असून लवकरच इन्स्टाग्राम स्टोरीज् फेसबुकवर लिंक करता येणार आहेत. फार पूर्वीपासूनच फेसबुकवर फोटो स्टोरीचा पर्याय उपलब्ध आहे, पण आता त्यात हे नवे फीचर युजर्सना उपलब्ध करून दिले जाईल.
