मला नोटबंदीची थोडी देखील कल्पना नव्हती – राजन


नवी दिल्ली – केंद्र सरकारने वारंवार नोटबंदीची तयारी काही महिन्यांपासून करण्यात आली होती, असे सांगितले आहे. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून नोटबंदीच्या महिनाभरआधी बाहेर पडलेल्या रघुराम राजन यांनी या निर्णयाबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे म्हटले आहे. मला कोणतीही कल्पना केंद्र सरकारच्या नोटबंदीची नव्हती. अमेरिकेतून मी स्वत: नोटा बदलून घेण्यासाठी भारतात आलो होतो, असे राजन यांनी म्हटले आहे.

लवकरच रघुराम राजन यांचे पुस्तक प्रकाशित होणार असून राजन याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना आपण काही भारतीय नोटा अमेरिकेत घेऊन गेलो होतो, असे त्यांनी सांगितले. नोटबंदीचा निर्णय मी अमेरिकेत असताना जाहीर झाल्यामुळे मला जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी मला भारतात यावे लागले असल्याचे राजन म्हणाले.

रघुराम राजन यांनी यावेळी पुन्हा एकदा आपण कधीही नोटबंदीचे समर्थन केले नसल्याचे अधोरेखित केले. नोटबंदी तात्कालिक स्थितीत चांगली वाटत असली, तरीही तिचे दीर्घकालीन फायदे कमीच आहेत. किंबहुना नोटबंदीमुळे भविष्यात फार काही सकारात्मक घडणार नाही, असे त्यांनी म्हटले.

Leave a Comment