
चाळीस वर्षापूर्वी म्हणजे ५ सप्टेंबर १९७७ रोजी नासाने पाठविलेले व्हॉएजर अंतराळ यान सौरमंडळ पार करून सूर्याच्या गुरूत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर इंटरस्टेलर म्हणजे आंतरतारका अंतराळात आजही कार्यरत असून या सीमा ओलांडून इतका दीर्घ काळ कार्यरत असलेले हे पहिले यान ठरले आहे. विशेष म्हणजे या यानातून जी सुवर्णाची हार्डडीस्क पाठविली होती त्यात असलेले अनेक आवाज आजही अंतराळात गुंजत आहेत व त्यात अन्य संगीताप्रमाणेच भारतीय संगीताचा समावेश आहे. म्हणजेच आजही अंतराळात भारतीय संगीताचे सूर दरवळत आहेत.
अंतराळात आजही गुंजतेय भारतीय संगीत
नासाने दीर्घ मोहिमेअंतर्गत हे यान नाठविले होते. आता ते १३ अब्ज मैल दूरवर गेले असून अजूनही त्याचा प्रवास सुरू आहे. ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने ते प्रवास आहे व त्यावरील संकेत प्रकाशवेगाने प्रवास करून पृथ्वीवर पोहोचण्यास १३ तास ८ मिनिटे लागतात. विशेष म्हणजे हे यान कोणतेही संकट जाणवले तर स्वतःच कांही सेकंदात प्रोग्रॅम तयार करू शकते. परग्रहावर जीवसृष्टी असेलच तर हे यान पृथ्वीवरून आले आहे हे समजावे यासाठी त्यात सोन्याची हार्डडीस्क ठेवली गेली असून त्यावर अमेरिकन अध्यक्षांचे भाषण, लहान मुलांचे रडणे, अनेक प्रकारचे संगीत रेकॉर्ड केले गेले आहेत.
