आता आईस्क्रीमचा स्वाद निवांत घेता येणार


आपल्या सर्वांच्या आवडीचे आईस्क्रीम फ्रिजर मधून काढल्यानंतर अगदी तीन तासांपर्यंत चघळत खाण्याची संधी आता आईसक्रीमप्रेमीना उपलब्ध होणार आहे. कारण जपानमधील संशेाधकांनी तीन तासांपर्यंन न विरघळणारे आईस्क्रीम तयार केले आहे. कनजावा विद्यापीठातील संशोधकांनी हा पराक्रम करून दाखविला आहे.

आईस्क्रीम हा पदार्थ आवडत नाही असा मनुष्यप्राणी भूतलावर मिळणे अवघड. पावसाळा असो, उन्हाळा की थंडी आईस्क्रीम कधीही खाल्ले जाते. मात्र अतिशय आवडीच्या आईस्क्रीमचा स्वाद चाखत माखत घेता येत नाही कारण ते बॉकसमधून काढले की विरघळायला लागते. त्याचे ओघळ येण्याअगोदर ते चटचट संपवावे लागते.यासाठी संशोधकांनी आईस्क्रीमचा मेल्टींग पॉईंट वाढविण्यात यश मिळविले असून त्यासाठी स्ट्राॅबेरीत सापडण्यार्‍या पॉलिफिनोल द्रव्याचा यशस्वी वापर केला आहे. कोणताही गोठविलेला द्रव पदार्थ ज्या तापमानाला विरघळू लागतो त्याला मेर्ल्टींग पॉईंट असे म्हटले जाते. प्रत्येक पदार्थासाठी तो वेगवेगळा असतो.

द टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार जपानी संशोधकांनी तयार केलेले हे आईस्क्रीम खोलीच्या तापमानात ३ तास तसेच घट्ट राहू शकते. त्यासाठी या आईस्क्रीमवर पाच मिनिटे हेअर ड्रायरचा वापर केला गेला तरीही ते विरघळले नाही. प्रो. तोमिहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार पॉलिफियॉन मध्ये असे गुणधर्म आहेत त्यामुळे पाणी व तेल वेगळे करणे अवघड बनते. या द्रव्याचा वापर करून चॉकलेट, व्हॅनिला, स्ट्राॅबेरी प्लेवरमधील आईस्क्रीम तयार केले गेले आहे.

Leave a Comment