
मुंबई : एअरटेलने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एक नवा डेटा टेरिफ प्लॅन लाँच केला असून यूजर्सला एअरटेलच्या या नव्या प्लॅनमध्ये दररोज तब्बल ३जीबी ४जी डेटा मिळणार आहे. आपला हा खास प्लॅन एअरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी आणला आहे. हा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध असणार आहे. यासोबतच अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगही ग्राहकांना मिळणार आहे.
एअरटेल आता दिवसाला देणार तब्बल ३जीबी ४जी डेटा
७९९ रुपये या प्लॅनची किंमत आहे. एअरटेलने हा नवा प्लॅन जिओच्या ‘धन धना धन’ ऑफरला टक्कर देण्यासाठी आणला आहे. रिलायन्स जिओ ५०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी ४जी डेटा देते. ज्याची वैधता ५६ दिवसासांठी असते. आपल्या यूजर्सला दोन्ही कंपन्या जास्तीत जास्त डेटा देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनची वैधता मात्र वेगवेगळी आहे.
