
नवी दिल्ली – ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘प्रधानमंत्री व्यय वंदना योजना’ नावाने एक पेन्शन योजना केंद्र सरकार आणत असून आज ही योजना अर्थमंत्री अरूण जेटली सादर करतील. ही पेन्शन योजना एलआयसीमार्फत ऑफलाइन किंवा ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करता येईल.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची ‘प्रधानमंत्री व्यय वंदना योजना’
कमाल ६० हजार रूपये वार्षिक पेन्शन म्हणजेच दरमहा ५ हजार रूपये या योजनेअंतर्गत मिळतील. ६० हजार पेन्शनसाठी एकरकमी ७,२२,८९० रूपये जमा करावे लागतील. या योजनेअंतर्गत किमान पेन्शन वार्षिक १२ हजार म्हणजे दरमहा १ हजार रूपये मिळतील. यासाठी एकरकमी १,४४,५७८ रूपये जमा करून पॉलिसी खरेदी करावी लागेल. १० वर्षांसाठी ही योजना असेल. म्हणजे एकदा पेन्शन योजना खरेदी केल्यानंतर पुढील १० वर्षांपर्यंत पेन्शन घेता येऊ शकते. या योजनेत ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तीला भाग घेता येऊ शकतो.
