आयसीआयसीआय देणार एटीएममधून १५ लाखापर्यंत कर्ज


नवी दिल्ली : आपल्या वैयक्तिक कर्ज व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आयसीआयसीआय बँकेने नवीन उपक्रम राबविला आहे. आपल्या एटीएमच्या माध्यमातून बँक १५ लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज पुरविणार आहे. निवडक ग्राहकांनाच हे कर्ज मिळणार आहे, ज्यांनी पहिल्यांदा कर्जासाठी अर्ज केलेला नाही.

पहिल्यांदाच वैयक्तिक कर्जासाठी ग्राहकांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी बँक पेडिट इनफर्मेशन कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीचा वापर करणार आहे. या प्रक्रियेनुसार निवडण्यात आलेल्या ग्राहकांना एटीएममधून व्यवहार पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर एक मॅसेज दाखविण्यात येईल. यामध्ये त्यांना वैयक्तिक कर्जाविषयी विचारण्यात येईल. कोणताही ग्राहक कर्जाचा पर्याय निवडत असेल तर त्याला पाच वर्षांसाठी १५ लाखाचे वैयक्तिक कर्ज देण्यात येईल. ही रक्कम ग्राहकाच्या खात्यात तत्काळ जमा होईल आणि त्याला एटीएममधून ही रक्कम काढता येईल. ही सेवा सुरू करण्यात आली आहे. कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी व्याज दर, प्रक्रिया शुल्क आणि ईएमआय यांची माहिती विचारण्यात येईल.

Leave a Comment