बालाजी टेलिफिल्म्समध्ये रिलायन्सची गुंतवणूक


नवी दिल्ली – बालाजी टेलिफिल्म्समध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ४१३.२८ कोटी रुपयांची गुंतवणूक करून २४.९ टक्के भागीदारी घेतली आहे. बालाजी टेलिफिल्म्समध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेल्या गुंतवणुकीमुळे इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२,५२,००,००० कोटींचे इक्विटी शेअर रिलायन्सला विकण्याचा निर्णय बालाजी टेलिफिल्म्सच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बालाजी टेलिफिल्म्स टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आघाडीवर आहे. भारतात रिलायन्सने जिओच्या माध्यमातून अगोदरच डिजिटल क्रांती केली असून आता या भागिदारीने ते फिल्म इंडस्ट्रीजमध्ये कोणती क्रांती करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Comment