घरगुती सिलेंडर जीएसटी लागू झाल्यानंतर महागला


नवी दिल्ली: १ जुलैपासून संपूर्ण देशभरात जीएसटी लागू होण्याअगोदर काही वस्तूंचे भाव कमी होतील तर काही किमती वाढतील असे म्हटले जात होते. जीएसटी एक जुलैपासून लागू झाल्यानंतर आता घरगुती सिलेंडरची किंमत वाढली असून तुम्हाला आता एलपीजी सिलेंडर घेण्याकरिता पूर्वीपेक्षा ३२ रुपये अधिक खर्च करावे लागणार आहे.

सिलेंडरचे भाव जीएसटी लागू झाल्यानंतर सब्सिडीमध्ये कपात केल्यामुळे वाढले. जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक राज्यांना एलपीजीसाठी टॅक्स नव्हता द्यावा लागत होता. पण काही राज्यांमध्ये यावर २ ते ४% इतका वॅट आकारला जात होता. पण एलपीजी आता ५ टक्क्याच्या स्लॅबमध्ये ठेवल्यामुळे त्याची किंमत १२ ते १५ रुपयांनी महागणार आहे.

याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार सरकारने जूनपासून एलपीजी सबसिडीमध्ये कपात केली आहे. उदाहरणार्थ जर एखाद्याला जर ११९ रुपये सब्सिडी येत होती तर त्याला आता १०७ रुपये सबसिडी मिळेल. जीएसटी आणि सबसिडीमुळे आता ३०-३२ रुपयांची वाढ होणार आहे. तर दुसरीकडे जीएसटी लागू झाल्यामुळे कमर्शियल एलपीजी सिलेंडरमागे ६९ रुपये कमी झाले आहेत. या आधी कमर्शियल सिलेंडरवर २२.५% पर्यंत कर लागत होता आणि तो १८ टक्क्यावर आला आहे.

Leave a Comment