९५ रूपयांत अनलिमिटेड कॉलिंग आणि २४ जीबी डेटा देणार जिओ


मुंबई – जीएसटी रेडी स्टार्टर कीट लोकप्रिय टेलिकॉम कंपनी जिओने लॉन्च केले असून जिओफाय या आपल्या वायफाय डिव्हाईससोबत जीएसटीसाठी मोबाईल बेस्ड सॉफ्टवेअर सोल्यूशन जिओने यात देऊ केले आहे. कंपनीच्या या ऑफरमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह २४ जीबीचा डेटाही दिला आहे.

काही शहरांत जिओ डोअरस्टेप सिम अॅक्टिव्हेशन सुविधाही आपल्या ग्राहकांना देणार आहे. जिओफाय हे रिलायन्स जिओचे पोर्टेबल ब्रॉडबँड डिव्हाईस असेल, जे ईएमआयवरही घेता येऊ शकेल. रिलायन्सने जीएसटी रेडी स्टार्टर कीटची किंमत १९९९ रुपये ऐवढी ठेवली आहे. तर ईएमआयवर हे कीट केवळ ९५ रुपयांना उपलब्ध राहणार आहे.

मोबाईल बेस्ड अॅप जिओच्या जीएसटी रेडी कीटमध्ये देण्यात येईल, ज्यात जीएसटी सुविधा प्रोव्हायडर आणि अॅप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर एका वर्षासाठी देत आहेत. या दोन सुविधांमुळे जीएसटीसंबंधी अकाऊंटिंग आणि बिलिंगसाठी कोणत्याही सॉफ्टवेअरची गरज नसणार आहे.

एका किंमतीत ५ सेवा देण्यात येणार असल्याचे जिओने स्पष्ट केले आहे. ज्यात जिओफाय, अनलिमिटेड व्हॉईस प्लस डेटा प्लॅन, जिओ बिलिंग अप्लिकेशन आणि जिओ नॉलेज सीरिज अशा पाच सेवा देण्यात येतील. एकूण ११ हजार रुपयांहून अधिकच्या सेवा फक्त १९९९ रुपयांमध्ये देत असल्याचा दावा रिलायन्सने केला आहे.

Leave a Comment