१२ जुलैला पेट्रोलपंप चालकांचा देशव्यापी संप


मुंबई – येत्या बुधवारी (५ जुलै) देशातील पेट्रोलपंप चालकांनी ‘नो पर्चेस डे’ जाहीर करीत १२ जुलै रोजी देशव्यापी संप पुकारण्याची घोषणा केली आहे. सर्व पेट्रोलपंपावर १०० टक्के स्वयंचलित प्रणाली तेल कंपन्यांनी लागू केली नसून ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने(एआयपीडीए) नव्या दर प्रणालीमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप केला आहे.

संघटनेचे प्रवक्ते अली दारुवाला याविषयी बोलताना म्हणाले की, तेल कंपन्यांसोबत आमच्या संघटनेची २९ जून रोजी एक महत्त्वपुर्ण बैठक पार पडली. तेल कंपन्यांनी त्यावेळी किंमतीची हमी आवश्यक असल्याचे मान्य केले होते. परंतु, याची अंमलबजावणी केव्हा होईल त्याबाबत नेमकी तारीख त्यांनी सांगितली नाही. आम्हाला ३० जूनच्या दुपारपर्यंत थांबण्याचे आवाहन कंपन्यांनी केले होते. पण अद्याप त्याबाबत समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळेच आम्ही हे आंदोलन पुकारत आहोत, असे म्हटले आहे.

Leave a Comment